मनात रुतलेली लाल-पिवळी बस ❤️💛
एस.टी. म्हटलं कि सर्वांत आधी डोळ्यांसमोर उभे राहणारे चित्र म्हणजे जुन्या लाल पिवळ्या गाड्यांच... अगदी सर्वांच्या तोंडात रुळलेला शब्द म्हणजे ' लाल डब्बा '...
पण हा ' लाल डब्बा ' अर्थात आपली 'लाल परी' रूढ अर्थाने कदाचित ७० ते ८० टक्के महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे आज कित्येक जण ग्रामीण भागांतून किंवा लहानशा शहरातून येऊन मोठमोठ्या हुद्द्यांवर पोहोचले आहेत. त्यांतील किमान ९० टक्के लोकांनी तरी आपल्या शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या शोधार्थ मोठ्या शहरांत येताना एस. टी. चा वापर केलाच असणार. म्हणूनच आपली हि एस. टी. सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
आज शिवनेरी, शिवशाही, अश्वमेध ह्यांसारख्या कितीही हाय क्लास गाड्या आल्या असल्या, तरी ह्या लाल परीची किंबहुना ह्या लाल पिवळ्या गाड्यांची जनमाणसांतील प्रतिमा कोणीच हिरावून घेणार नाही. हल्ली परिवर्तनच्या
लाल गाड्यांच्या गर्दीत ह्या लाल पिवळ्या बसेस जरी हरवून गेल्या आहेत, पण आजही त्यांना पाहिले कि उर अभिमानाने भरून येतो.' एस. टी. = लाल पिवळी गाडी ', हे समीकरण सदैव आपणा सर्वांना अभिमानास्पद राहील, ह्यात शंकाच नाही.
तर अशी हि आपली लाल पिवळी जुनी यष्टी...
औरंगाबाद-कसाबखेडा या ग्रामीण मार्गावर सेवा देणारी जुनी लाल-पिवळी बस❤️
कोणा-कोणाला आवडायची ही बस, कमेंटद्वारे नक्की कळवा..
एसटीच्या मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा-https://instagram.com/javed_clickz?igshid=YmMyMTA2M2Y=
Comments