लालपरीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का ?
एसटीचे (लालपरीचे) फोटो/व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
एस टी ची स्थापना आणि तिचा इतिहास (MSRTC History)
वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खाजगी Company कडून सुरू झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली.
स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (BSRTC) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.
बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली.
पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली.
त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला.
एस.टी. च्या सेवा आणि तिचा विस्तार:-
“गाव तेथे एसटी”, “रस्ता तेथे एसटी” या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते.
त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते, ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यांत विस्तार झाला आहे.
आधुनिकीकरण (MSRTC):-
एस.टी.ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत.
डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले.
शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवीत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.
एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले.
मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे.
बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा दिली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात.
तसेच २०१७पासून महामंडळाने ‘शिवशाही’ या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या आहेत.
एस टी चे संचालक मंडळ
S.T. च्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़.
त्यापैकी अध्यक्ष हा महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री असतो तर व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष हा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो.
सध्याचे संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे.
अध्यक्ष-
उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक – श्री शेखर चन्ने (IAS)-धीर श्रीवास्तव –
यशवंतराव इ. केरुरे – शासकीय संचालक
इराने चेरियान – शासकीय संचालक
सतीश पुंडलिक दुधे – शासकीय संचालक
डॉ. प्रवीण गेडाम – शासकीय संचालक
प्रशासकीय कार्यालये (MSRTC)
मध्यवर्ती कार्यालय :
महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.
मध्यवर्ती कार्यशाळा :
१) मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे.
२) मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, औरंगाबाद.
३) मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगणा, नागपूर.
विभागीय कार्यालय :
१) मुंबई
२) पुणे
३) नाशिक
४) औरंगाबाद
५) अमरावती
६) नागपूर
मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था :
मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी, पुणे.
कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापन:-
MSRTC महामंडळात एकूण २२ कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत. श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा १९७१ नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
ST कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुविधा हा कायमच कर्मचारी संघटना आणि महामंडळाचे व्यवस्थापन यांच्यात वादाचा मुद्दा राहिलेला आहे.
एसटीचे आकर्षक मार्गफलक योग्यदरात बनवून मिळेल. संपर्क-९६०७६१७८८९



Comments