लालपरीचे मनोगत


                        मी लालपरी बोलते, माझ्या महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्माचे प्रवासी बंधू मला का जाळतात मी काय आरक्षण देणार आहे. मी काही एखादी गोष्ट तुम्हाला मिळून देणार आहे, मला जाळून तुम्हाला काय फायदा होतो. मला जळताना तुम्हाला कुठे वेदना होऊ नये असे माझ्या मनात येते पण तुम्हाला मला जाळताना तुम्हाला एक असुरी आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे, मी प्रवास करताना आगारांमधून आनंदात निघते पण तुमच्यासारखे लोक ज्यांना कुठलाही विचारधारेचा पाठिंबा नसतानाही तुम्ही कुठल्यातरी नावाखाली मला जा चा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील कुठले आंदोलन असो मलाच का टार्गेट करण्यात येते हेच मला समजेना. मी १९५२ पासून अविरत धावत आहे, मी तुमची काळजी घेते. आज महाराष्ट्रात दिवसदिवास माझे रुपडे बदलत आहे, जशी मुला-मुलींना मानव विकास, शिवशाही, स्लीपर कोच, स्लीपर-सीटर, हिरकणी असे अनेक प्रकारची होऊन तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी अनेक चांगल्या कामासाठी मी धावते, तुम्ही शिक्षण घेऊन डॉक्टर,इंजिनियर, कलेक्टर, तहसीलदार, काही आधुनिक शेती करणारे कामगार आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टी साठी मी धावते.

माझी काळजी घेणारी माझे भाऊ चालक, वाहक व मेकॅनिक अशी एसटी कर्मचारी व अधिकारी माझी देखभाल करतात तरी मला देशात अथवा महाराष्ट्रात कुठेही काही असल्यास मलाच का टार्गेट करत आहे तुमच्या ज्या मागण्या आहे ते रास्त असेल ते तुम्ही संविधानिक प्रमाणे संविधानिक प्रमाणे मागवे माझ्या बरोबर काम करणारे एसटी कर्मचारी यांचे अगोदर च पगार कमी आहे तुम्ही असेच नुकसान करीत राहिल्यास एक दिवस असा येऊ नये, मग सरकारने जर महामंडळ बंद केले तर तुमच्या मुलाचे शिक्षण,दवाखाना,नौकरी अनेक प्रकारची कामे थांबतील व तुम्हाला ना विलजस्तव आर्थिक भार सहन करावा लागेल तरी मी आज पर्यंत माझी वेदना कुठंही व्यक्त केली नाही.

मी आज हात जोडून विनंती की सर्व पत्रकार, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, तहसीलदार व सर्व माझे संगतीला प्रवास केलेल्या प्रवाशांना मी विनंती करते की मला या सर्व गोष्टी पासून वाचवा, हीच प्रार्थना करत आहे 


लेख:- श्री.एस. के  waghrulkar (अंबड आगार,जालना विभाग)

                                ------ 

आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा:- https://instagram.com/javed_clickz?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==

Comments