एसटीची कधीही न थांबणारी दोन चाके
मला वाटत हि दोन चाक कधीच थांबत नाहीत.एसटीचा ब्रिदवाक्याप्रमाणे प्रवाशांचा सेवेसाठी हे दोघे आयुष्यभर झटत असतात.कमी सुविधा, कमी पगार असून सुद्धा आपला कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात.तुम्हीच बघा ना होळी, गणपती, दिवाळी या सणांत सुद्धा ते डबल डबल ड्युटी करतात..त्यांनाही वाटत असेल या सणांमध्ये आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करावेत.पण कामामुळे त्यांना हे क्षण कमी मिळतात.हे सगळं मनातलं दुःख बाजूला ठेवून ते प्रवाशांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाकडे पोचवत असतात. प्रवाशांची सेवा हाच त्यांचा साठी सण आहे.
![]() |
एसटीचे चालक काका जेव्हा घाट चढत असतात तेव्हा शिकवत असतात ह्या घाटा सारखेच चढ -उतार, वळण आपल्या आयुष्यात येत असतात.आयुष्यातील या चढ उतार आणि वळणांवरून प्रवास करत आपला प्रवास चालू ठेवायचा असतो.एसटीचे चालक जेव्हा हायवे वरून वेगाने एसटी चालवत असतात तेव्हा सांगत असतात कि या वेगा प्रमाणेच आयुष्यातील दुःख लवकर निघून जातील..तसेच एखाद्या दुर्गम भागात जेव्हा आपल्या चालक एसटी घेऊन जातात तेव्हा ते शिकवत असतात कि ज्या ठिकाणी कोणी पोचलं नाही अशा ठिकाणी तुम्ही पोचू शकता..
वाहक काका कडून सुद्धा बरंच शिकण्या सारखं आहे .आपली एसटी जेव्हा नाश्त्याला किंवा जेवायला थांबते आणि हे सगळं झाल्यावर आपले सगळे प्रवासी एसटीमध्ये आलेत कि नाही याची जबाबदारी ते बरोबर घेतात .तसेच आपल्या आयुष्यात हि आपण आपल्या माणसांना सोबत घेऊन चाललं पाहिजे.एसटीतून जेव्हा एखाद्या स्टॉप वर प्रवासी उतरतात तेव्हा बेल वाजवून वाहक काका चालक काकांना पुढे जाण्यासाठी सांगत असतात ..तसेच आपल्या आयुष्यात हि आहे ,जीवनात दुःख समस्या यांचे थांबे येणारच आणि हे थांबे पार करूनच आपल्या ध्येयाकडे पोचायचं असत आणि थोडं थांबावं वाटलं तर एसटीची बेल आठवा आणि पुढे जा.
मला नेहमीच वाटत आजही जिथे इंटरनेट पोचलं नाही अशा काही ठिकाणी आपली एसटी पोचली आहे तेही फक्त या दोन चाकांमुळेच ..
माझा हा लेख एसटीच्या सर्व चालक आणि वाहकांसाठी साठी..!
आमचे इतर ब्लॉग्ज वाचा
▪️ठाणे जिल्ह्यातील वाडा बसस्थानकाचे वेळापत्रक पहा- https://buskaaashik.blogspot.com/2024/05/work-in-progress.html
▪️बोईसर आगारचे वेळापत्रक पहा- https://buskaaashik.blogspot.com/2024/06/blog-post_11.html
▪️ लोकं म्हणतात....- https://buskaaashik.blogspot.com/2024/04/blog-post.html
▪️लालपरीचे मनोगत- https://buskaaashik.blogspot.com/2023/10/blog-post.html
▪️ मनात रुतलेली लालपरी- https://buskaaashik.blogspot.com/2022/12/blog-post_20.html
▪️लालपरीचे मनोगत- https://buskaaashik.blogspot.com/2023/10/blog-post.html

Comments